Stone Throwing In Amravati : बंदसाठी दगडफेक; त्रिपुरा घटनेचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati News

अमरावती : बंदसाठी दगडफेक; त्रिपुरा घटनेचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या जमावातील काहींनी प्रतिष्ठाने बंद करण्याची मागणी केली. तीन व्यापारी प्रतिष्ठांनावर दगडफेक केली. त्यात एक जण जखमी झाल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.

काही दिवसांपूर्वी त्रिपुरा येथे धार्मिक स्थळावर काही असामाजिक तत्त्वांनी तोडफोड करून धार्मिक ग्रंथांची जाळपोळ केली. अनेकांना जबर मारहाण झाली. अनेक घरांची जाळपोळ केली. शिवीगाळ करून समाजाच्या धार्मिक भावना दुखवून वातावरण चिघळण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा: आघाडीचे सरकार अलिबाबा, चाळीस चोरांचे; ४० चोरांचे पितळ उघडे करणार

या घटनेच्या निषेधार्थ शहरातील मस्लिम बहुल भागातील काही दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दुपारी अडीचच्या सुमारास घोषणा देत नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचत होते. त्यापैकी काहींना चित्रा चौकात मुरमुरे, फुटाणे विक्रेत्यांची काही दुकाने उघडी दिसली.

काही संतप्त नागरिकांनी बंदची मागणी करून दुकानाच्या दिशेने दगडफेक केल्याचे सांगण्यात येते. त्यात फुटाने विक्रेता श्रीराम गुप्ता हे जखमी झाले. वसंत चौक बालाजी मंदिराजवळ मेडिकल पॉइंटवर सुद्धा काहींनी दगड भिरकावले. चित्राचौक ते जुन्या कॉटन मार्केट मार्गावरील गोपाल किराणा या प्रतिष्ठानलाही बंद करण्यासाठी दगडफेक झाली.

हेही वाचा: अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार यांना करता येणार नाही; म्हणूनच...

पोलिसांनी घेतली योग्य ती काळजी

जमावातील काहींनी तुरळक दगडफेक केल्याच्या घटनेला पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दुजोरा दिला. या घटनेनंतर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली, असे साळी यांनी सांगितले.

loading image
go to top