T20 WC : हॅटट्रिक मॅन हसरंगा ठरला टॉपर!

अवघ्या 35 धावांत इंग्लंडने तीन विकेट गमावल्या. यात चमिराने एक तर वनिंदू हसरंगाने दोन विकेट घेतल्या.
Wanindu Hasaranga
Wanindu Hasaranga T20 World Cup Twitter

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 मधील पहिल्या गटात श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना शारजाच्या मैदानात रंगला आहे. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेतील मुख्य लढतीत अपराजित राहिलेल्या इंग्लंडच्या संघाला सुरुवातीलाच धक्के देत श्रीलंकेनं त्यांना बॅकफूटवर ढकलले. अवघ्या 35 धावांत इंग्लंडने तीन विकेट गमावल्या. यात चमिराने एक तर वनिंदू हसरंगाने दोन विकेट घेतल्या.

सलामीवीर जेसन रॉयची विकेट घेत त्याने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले. बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत हसरंगा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात हसरंगाने हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला होता. पण त्यानंतरही श्रीलंकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Wanindu Hasaranga
कोहलीसारख्या लढवय्याला हे बोलणं शोभत नाही, कपिल पाजींनी फटकारले

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हसरंगापाठोपाठ बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉटलंडच्या जोश दवेच्या खात्यात 9 विकेट जमा आहेत. मुस्तफिझूर रहमान (बांगलादेश), महिश तीक्षणा (श्रीलंका), आणि लाहिरु कुमारा (श्रीलंका) यांनी प्रत्येकी 8-8 विकेट घेतल्या असून हे अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

Wanindu Hasaranga
IND vs NZ: "हा विराटने रोहितचा केलेला अपमान"; गावसकर भडकले...

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका ज्या पहिल्या गटात आहे त्यात खूपच तगडी फाईट आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडच्या संघाने तीन पैकी तीन सामने जिंकून गटात अव्वलस्थान पटकावले आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवून सेमीफायनल खेळण्याचे गणित सोपे केले आहे. इंग्लंड पाठोपाठ या गटातून दुसरा कोणता संघ पात्र ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या तीन संघात यासाठी शर्यत असेल. इंग्लंड विरुद्धचा सामना गमावला तर श्रीलंकेची गणितं बिघडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com