T20 World Cup: फलंदाज नाबाद असूनही बांगलादेशला का नाकारण्यात आला चौकार? काय सांगतो ICC चा नियम, घ्या जाणून

SA vs BAN: टी20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 4 धावांनी पराभूत झाले, पण याच सामन्यात बांगलादेशला एका नियमाचा मोठा फटका बसला. रिव्ह्युमध्ये त्यांचा फलंदाज नाबाद असल्याचे दिसल्यानंतरही त्यांना चौकार मिळाला नव्हता.
South Africa vs Bangladesh | T20 World Cup 2024
South Africa vs Bangladesh | T20 World Cup 2024Sakal

T20 World Cup 2024, South Africa vs Bangladesh: सोमवारी (10 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध 4 धावांनी विजय मिळवला. न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात एक निर्णय वादात अडकला आहे.

झाले असे की बांगलादेश दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 व्या षटकात ओटनील बार्टमॅनने टाकलेल्या दुसऱ्या चेंडू खेळताना महमुद्दुलाहचा चुकला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागून सीमापार गेला. पण या चेंडूवर पंचांनी महमुद्दुलाहला पायचीत बाद दिले.

South Africa vs Bangladesh | T20 World Cup 2024
T20 World Cup: फक्त 4 धावांचा फरक... दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सामन्यात अंपायरचा 'तो' निर्णय ठरला वादग्रस्त

मात्र महमुद्दुलाहने रिव्ह्यू घेतला, ज्यात चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जातानाचे दिसल्याने पंचांना निर्णय बदलावा लागला आणि महमुद्दुलाहला जीवदान मिळाले. दरम्यान, महमुद्दुलाहला नाबाद दिले असले तरी बांगलादेशला चौकार मिळाला नाही, कारण पंचांनी बाद दिले, त्याचवेळी तो चेंडू डेड झाला होता.

याबद्दल आयसीसीच्या प्लेइंग कंडिशनच्या अपेंडिक्स डी मध्ये नियम समजावण्यात आला आहे.

यातील 3.7 च्या नियमानुसार जर पंचांनी दिलेला बादचा निर्णय खेळाडूच्या रिव्ह्युनंतर नाबादमध्ये बदलण्यात आला, तरी ज्यावेळी पंचांनी आधीचा निर्णय दिलेला आहे, त्याचवेळी चेंडू डेड झाल्याचा निर्णय कायम केला जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांबाबत यावेळी कोणताही फायदा दिला जाणार नाही.

त्याचबरोबर जर पंचांनी आधी नाबाद दिले असेल आणि रिव्ह्युनंतरही नाबादचा निर्णय कायम राहिला, तर फलंदाजाला धावा मिळू शकतात.

South Africa vs Bangladesh | T20 World Cup 2024
T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या चेंडूवर बांगलादेशविरुद्ध रोमांचक विजय; सुपर-8 मध्येही थाटात एन्ट्री

त्याचबरोबर जर पंचांनी आधी नाबाद दिले असेल आणि रिव्ह्युनंतर फलंदाज बाद झाला, तर फलंदाज बाद झाला, त्याचवेळी चेंडू डेड होईल आणि त्याने केलेल्या धावाही ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

ICC rules
ICC rulesScreengram: icc-cricket.com and lords.org/mcc

दरम्यान, याच नियमाचा बांगलादेशला फटका बसला. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेश हा सामना अवघ्या 4 धावांनी पराभूत झाले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 113 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशला फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 109 धावा करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com