T20 WC : विराटच नव्हे तर पोलार्डच्या मागेही टॉसची 'पनौती'

ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.
Australia vs West Indies
Australia vs West Indies Sakal

Australia vs West Indies : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात अबुधाबीच्या मैदानात सामना रंगला आहे. अ‍ॅरॉन फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

Australia vs West Indies
... तर बॅग पॅक करुन घरी जाईन; जाडेजाचा मजेशीर रिप्लाय

वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील साखळी फेरीतील ही अखेरची लढत आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाच पैकी केवळ एकाच सामन्यात पोलार्डने टॉस जिंकला आहे. दुसरीकडे नाणेफेकीच्या बाबतीत फिंचने एकमेव टॉस गमावला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेबर्थडे दिवशी स्कॉटलंड विरुद्ध पहिला सामना जिंकला होता.

Australia vs West Indies
IND vs SCO: कोहलीला मिळालं बर्थ डे गिफ्ट... अखेर टॉस जिंकला!

सुपर 12 च्या पहिल्या गटात इंग्लंडच्या संघाने चार पैकी चार सामने जिंकत 8 गुणासह सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. या गटात ऑस्ट्रेलिया 3 सामन्यातील विजयासह 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून ते थेट सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी उत्सुक असतील. जर वेस्ट इंडीजने सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेची गणित सोपी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com