मोठी बातमी : T20 World Cup 2028 साठी १२ संघ निश्चित झाले! भारतात खेळण्यास नकार देणारा बांगलादेशही खेळणार, डायरेक्ट एन्ट्री

12 teams qualified for T20 World Cup 2028: दोन वर्षांनी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १२ संघांचे स्थान निश्चित झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अधिकृतपणे पात्र ठरलेल्या संघांची घोषणा केली असून, त्यात बांगलादेश संघाचाही समावेश आहे. बांगलादेशने थेट पात्रता मिळवत मोठे यश संपादन केले आहे.
Twelve teams have officially secured qualification for the ICC Men’s T20 World Cup 2028

Twelve teams have officially secured qualification for the ICC Men’s T20 World Cup 2028

esakal

Updated on

Bangladesh direct qualification for Men’s T20 World Cup 2028: सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून हाकलल्यानंतरही बांगलादेशने २०२८ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची थेट पात्रता निश्चित केली आहे. बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्कॉटलंडला त्यांच्या जागी संधी दिली. आयसीसीने दोन वर्षानंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या १२ संघांची नावे जाहीर केली आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे यजमान म्हणून आधीच पात्र ठरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com