India Under-19s tour of England : वैभव सूर्यवंशीचा आक्रमक खेळाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. वैभवने ५२ चेंडूत १९ वर्षांखालील संघाकडून वन डेत पहिले शतक साजरे केले. हे या वयोगटातील सर्वात वेगवान शतक ठरले आणि १९ वर्षांखालील वन डे सामन्यांत शतक करणारा तो युवा फलंदाज ठरला. त्याने इंग्लंडविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना १४३ धावांची वादळी खेळी केली. भारताने २९ षटकांत २ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला आहे आमि विहान मल्होत्रा अर्धशतक पूर्ण करून खेळतोय...