RCB fourth consecutive win in Women’s Premier League
esakal
RCB fourth consecutive win in Women’s Premier League: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील विजयी घोडदौड कायम राखली आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना त्यांनी ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकताना विजयाचा चौकार मारला आणि WPL Point Table मध्ये अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. DC च्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana )ने १३ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करून ६१ चेंडूंत ९६ धावांची खेळी केली. संघाला विजयासाठी १२ धावांची गरज असताना स्मृती बाद झाली आणि तिचे शतक हुकले.