Teen Sensation Smashes 327 Not Out in 134 Balls: युवा वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पदार्पण करताना मैदान गाजवले. १४ वर्षीय वैभवने भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाची नोंद करून मोठा पराक्रम गाजवला. आता त्याचा पाहून त्याचे मित्र अन् त्याच्या वयाचे अनेक खेळाडू मोठी स्वप्न पाहू लागली आहेत. वैभवसोबत खेळलेला १३ वर्षीय त्याचा मित्र, अयान राज याने जिल्हा क्रिकेट लीग स्पर्धेत ( ३० षटकांची) ३२७ धावांची वादळी खेली केली. बिहारच्या अयालाही वैभवच्या पावलावर पाऊल ठेवायचे आहे.