14 Fours, 23 Sixes! ट्वेंटी-२० सामन्यात स्कॉट एडवर्ड्सचं द्विशतक; ८१ चेंडूंत चोपल्या २२९ धावा

Scott Edwards 229 runs off 81 balls T20 match: ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशक्य वाटणारी कामगिरी नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक T20 लीग सामन्यात एडवर्ड्सने अवघ्या ८१ चेंडूंमध्ये २२९ धावा कुटल्या.
Scott Edwards 229 runs off 81 balls T20 match

Scott Edwards 229 runs off 81 balls T20 match

esakal

Updated on

Netherlands captain Scott Edwards double century explained: नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने ऑस्ट्रेलियातील स्थानिक T20 डिव्हिजन वन क्लेंझो ग्रुप शिल्ड स्पर्धेत एल्टोना स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना अचंबित करणारी खेळी केली आहे. त्याने विलियम्स लँडीग एससी क्लबविरुद्ध सलामीला येताना द्विशतक झळकावले. एडवर्ड्सने पहिल्याच षटकात ११ धावा कुटून आपला इरादा स्पष्ट केला. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज प्रिन्स चौहानला त्याने सलग तीन चौकार खेचले.. त्याने सलग दोन षटकार खेचून २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com