Vaibhav Suryavanshi fastest century in Vijay Hazare Trophy
esakal
Vijay Hazare Trophy LIVE Updates : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि रोहित शर्मा व विराट कोहली या दोन स्टार्सचा खेळ कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित २०१८ नंतर प्रथमच या स्पर्धेत मुंबईकडून खेळतोय, तर विराटने १० वर्षानंतर दिल्लीसाठी या स्पर्धेतून पुनरागमन केले आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने दोघांसाठी या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे महत्त्वाचे आहे. रोहित, विराटची चर्चा सुरू असताना तिथे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi ) धडाकेबाज खेळी केली आहे.