Rehan Ahmed joins Delhi Capitals as a replacement for Ben Duckett in IPL 2026.
esakal
Who is Rehan Ahmed England young spinner IPL signing? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघात महत्त्वाचा बदल पाहायला मिळतोय. त्यांनी इंग्लंडचा १८ वर्षीय फिरकीपटू रेहान अहमदला IPL २०२६ च्या उर्वरित हंगामासाठी करारबद्ध केले आहे. तो इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट (Ben Duckett) याचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला आहे. रेहानला ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेण्यात आले आहे