Priyanshu Moliya Creates History
esakal
Priyanshu Moliya scores unbeaten 321 against Jammu and Kashmir: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या फलंदाजांची चलती सुरू असल्याचे दिसतेय...शालेय क्रिकेट असो, देशांतर्गत क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय सामना... भारताचे फलंदाज आपल्या आक्रमकतेचं प्रदर्शन घडवत आहेत. दिल्लीच्या एका शालेय ट्वेंटी-२०त पठ्ठ्याने तिहेरी शतक झळकावले. तेच रणजी करंडक स्पर्धेतही एका २१ वर्षाच्या पोराचे त्रिशतक पाहायला मिळाले आणि अनेक विक्रमही तुटली. बडोदा संघाकडून खेळणाऱ्या प्रियांशु मोलियाने रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी ही अविस्मरणीय खेळी करून संघाला ६१६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने या शतकासह ६९ वर्ष जुना विक्रमही मोडला.