Vaibhav Sooryavanshi has made a sensational start to his T20 career
esakal
Vaibhav Sooryavanshi vs Chris Gayle after 40 T20 matches: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी क्रिकेटचे मैदान गाजवतोय... नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याने ३ सामन्यांत १५१ धावा करताना प्लेअर ऑफ दी सीरिजचा पुरस्कार जिंकला. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचे अनेक विक्रम मोडले आणि आता त्याला गेलचा १७५ धावांचा स्पर्धा विक्रम मोडायचा आहे. पण, सध्याची आकडेवारी पाहिल्या वैभवने विंडीजच्या महान फलंदाजावर कुरघोडी केलेली दिसतेय. वैभवने कारकीर्दित आतापर्यंत ४० ट्वेंटी-२० सामने खेळले आणि गेलच्या सुरुवातीच्या ४० सामन्यांशी त्याच्याशी तुलना केल्या, भारताचा युवा स्टार वरचढ ठरतोय.