MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

MS DHONI SUPERBIKE RIDE VIDEO: माजी कर्णधार एमएस धोनीचे बाईकप्रेम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चेन्नईजवळील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर त्याने सुपरबाईकवर हाय-स्पीड लॅप्स मारले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Ms Dhoni Superbike Ride Video

Ms Dhoni Superbike Ride Video

Sakal

Updated on

MS Dhoni Racing Track Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे बाईक प्रेम लपून राहिलेले नाही. त्याला दुचाकी गाड्या चालवायला प्रचंड आवडतं. त्याच्या रांचीच्या फार्महाऊसवर विविध ब्रँडच्या शेकडो दुचाकी त्याच्या गॅरेजमध्ये असून अनेकदा त्यांचा फोटोही व्हायरल झाले आहेत.

अनेकदा धोनी एखादी विंटेज गाडी चालवतानाही रांचीच्या रस्त्यांवर दिसतो. पण आता पुन्हा एकदा त्याचं बाईकप्रेम सर्वांसमोर आलं आहे. तो नुकताच चेन्नईजवळील इरुंगट्टुकोट्टाई येथील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर सुपरबाईक चालवताना दिसला होता. त्याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.

Ms Dhoni Superbike Ride Video
Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com