Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

MS Dhoni- Rishabh Pant Video: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी रांचीमध्ये धोनीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rishabh Pant with MS Dhoni

Rishabh Pant with MS Dhoni

Sakal

Updated on

MS Dhoni - Rishabh Pant Viral Video: भारतीय कसोटी संघाला आता श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे, या दौऱ्यासाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचाही समावेश आहे. पंत गेल्या काही काळापासून फारसा फॉर्ममध्ये दिसलेला नाही. असे असतानाच रिषभ पंत सध्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात धोनी आणि पंत एकत्र गाडीतून जाताना दिसत आहे.

Rishabh Pant with MS Dhoni
IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com