
6th December Cricketers Birthday Playing XI: क्रिकेटमध्ये ६ डिसेंबर ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या तारखेला सर्वाधिक क्रिकेटपटूंचा जन्म झाला आहे. हो हे खंरं आहे, याच तारखेला जन्मलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं देखील आहे.
विशेष म्हणजे फक्त ६ डिसेंबर या तारखेला जन्मलेल्या क्रिकेटपटूंचा एक संपूर्ण क्रिकेट संघ तयारही होऊ शकतो. यात भारताच्या चक्क ५ स्टार खेळाडूंचाही समावेश होऊ शकेल.