
भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीवरही जोरदार टीका केली आहे. त्यांनी अनेकदा विराट कोहलीवरही टीका केली आहे.
आता पुन्हा एकदा त्यांनी धोनीच्या कर्णधारपदावर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी माजी निवडकर्ते मोहिंदर अमरनाथ यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. २०११ नंतर कमीतकमी ७ जणांच करियर उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी म्हटलंय.