MS Dhoni retirement confirmed or not? चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा शेवट विजयाने केला असला तरी त्यांना तालिकेत शेवटच्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या, परंतु प्रत्येकवेळी त्याने त्या उडवून लावल्या. यावेळीही CSK च्या शेवटच्या साखळी सामन्यात धोनीसमोर तू पुढची आयपीएल खेळणार का, हा प्रश्न येणं साहजिक होते. समालोचक हर्षा भोगले यांनी तो प्रश्न विचारलाच, परंतु यावेळी धोनीच्या बोलण्यात आत्मविश्वास नव्हता आणि त्याचं मन तळ्यात-मळ्यात असल्याचे जाणवले.