Sanju Samson’s explosive 87 powers CSK to a crucial win over Delhi Capitals in IPL 2026.
esakal
Delhi Capitals vs Chennai Super Kings Marathi Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये चेन्नई सुपर किंग्सने प्ले ऑफचे आव्हान कायम राखले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) याने मॅच विनिंग खेळी केली. CSK ने या विजयासह IPL 2026 Point Table मधील आपले सहावे स्थान मजबूत केले आहे, तर दिल्लीचा पुढील मार्ग खडतर झाला आहे. दिल्लीचा १० सामन्यांतील हा सहावा पराभव ठरला आणि ते ८ गुणांसह सातव्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांना उर्वरीत ४ सामने जिंकून १६ गुणांपर्यंत पोहोचता येईल, परंतु प्ले ऑफसाठी त्यांना अन्य संघांवर अवलंबून रहावे लागेल.