Key performances from India A before England Test series : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या तयारीला वेग पकडला आहे. लोकेश राहुल, अभिमन्यू इश्वरन, करुण नयर, यशस्वी जैस्वाल, नितीश रेड्डी व शार्दूल ठाकूर हे लंडनमध्ये आधीच दाखल होऊन सराव सामनेही खेळले. मुख्य संघ उशीराने लंडनमध्ये आला आणि त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. आता भारत अ आणि मुख्य संघ यांच्यात सराव सामना होईल. पण, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन सराव सामन्यांतून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार शुभमन गिल यांना अपेक्षित उत्तरं मिळाली का?