Sameer Rizvi celebrates his unbeaten 100 off 46 balls, featuring 9 sixes and 6 fours, as he guides Uttar Pradesh to victory against Mizoram
esakal
Sameer Rizvi scores unbeaten 100 off 46 balls against Mizoram: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री अविश्वसनीय सामना पाहायला मिळाला.. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील मिझोराम विरुद्ध उत्तर प्रदेश लढतीने क्रिकेट चाहत्यांना खिळवून ठेवले. मिझोरामने विजयासाठी ठेवलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली होती. या परिस्थितीत दिल्ली कॅपटिल्सचे प्रतिनिधित्व करणारा २२ वर्षीत समीर रिझवी मैदानावर उभा राहिला. त्याने नाबाद शतकी खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.