
Watch Glenn Maxwell’s 122-meter longest six in BBL history : ग्लेन मॅक्सवेल मैदानावर उभा राहिला, तर काय करू शकतो हे आपण २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत पाहिले. एका पायात प्रचंड वेदना असूनही त्याने द द्विशतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. तोच मॅक्सवेल आता बिग बॅश लीग गाजवताना दिसतोय. मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व करताना मॅक्सवेलने आणखी एक वादळी खेळी केली आणि त्याने BBL च्या इतिहासातील सर्वात लांब षटकार खेचून विक्रमही नोदंवला.