Mohsin Naqvi trolled for wrong Pakistan PM name
esakal
Aakash Chopra reaction on Mohsin Naqvi controversy: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ यांची इस्लामाबाद येथे भेट घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर पाकिस्ताननेही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनीही भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. याच संदर्भात नक्वी यांनी काल शरिफ यांची भेट घेतली आणि येत्या शुक्रवारपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. पण, ही माहिती देताना नक्वी यांची खूप मोठी चूक केली आणि भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने ती चूक पकडली.