IND vs SA 1st T20I : संजू सॅमसन, कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही जागा; पहिल्या ट्वेंटी-२० साठी निवडला भारतीय संघ

India probable playing XI for 1st T20I 2025: पहिल्या सामन्यासाठी भारताच्या माजी खेळाडूने त्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे आणि त्यात संजू सॅमसन व कुलदीप यादव या दोघांना निवडले गेलेले नाही.
Aakash Chopra  India Playing XI for the 1st T20I vs South Africa

Aakash Chopra India Playing XI for the 1st T20I vs South Africa

esakal

Updated on

IND vs SA T20I match preview and squad discussion: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. कटक येथे हा सामना सायंकाळी ७:३० वाजल्यापासून सुरू होईल. २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे फक्त १० सामने आहेत आणि त्यामुळे संघात फार अदलाबदल करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा कोणताच इरादा नाही. त्याने हे काल पत्रकार परिषदेतही स्पष्ट केले. त्यामुळे संजू सॅमसन ( Sanju Samson) याच्या समावेशाबद्दल शंका आहेच. त्यात माजी भारतीय खेळाडूनेही आजच्या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमधून संदू व कुलदीप यादव यांना बाहेर ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com