
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारतीय संघाने या वर्षाच्या सुरूवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला होता. पण मर्यादीत षटकात भारताची कामगिरी चांगली होत असली, तरी कसोटीत मात्र गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी खालवल्याचे स्पष्ट दिसले आहे.
भारताने गंभीरच्या नेतृत्वात खेळलेल्या शेवटच्या ११ कसोटी सामन्यांपैकी भारताने फक्त ३ सामने जिंकले आहेत. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारतीय संघ ५ शतके आणि ८०० हून अधिक धावा करूनही पराभूत झाला. या सामन्यात भारताने शेवटपर्यंत पकड मजबूत ठेवली होती, पण तरी अखेरीस इंग्लंडने भारताला मात देण्यात यश मिळवलं होतं.