
तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होत. हेडिंग्ले येथे झालेल्या या सामन्यात भारताकडून ५ शतके ठोकण्यात आली होती. पण असे असतानाही शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून गेल्या वर्षभरात भारताने ११ कसोटी सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारताने मायदेशात १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धही १० वर्षांनंतर कसोटी मालिकेत पराभव स्वीकारला.
आता इंग्लंड दौऱ्याची सुरुवातही पराभवाने झाली आहे. त्यामुळे सध्या कसोटीतील गंभीरच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.