

ARYAVEER SEHWAG
esakal
ARYAVEER SEHWAG: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघांमध्ये तीन सामन्यांची युवा वनडे अनधिकृत मालिका सुरू आहे. या मालिकेत वीरेंद्र सहवागचा मुलगा आर्यवीर सहवाग आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड खेळत आहेत.
सोमवारी (२१ सप्टेंबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात आर्यवीर अर्धशतक करण्यापासून अवघ्या ३ धावा दूर राहिला, तर अन्वय द्रविडलाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र, यशवर्धन चौहानने दमदार शतक ठोकत भारताची धावसंख्या मोठी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.