
Australia vs India Test Series: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या पराभवामागे फलंदाजांचे अपयश हे एक मोठे कारण ठरले. त्यातही अनुभवी फलंदाजांना मोठ्या धावा करताना अडचणी आल्या.
भारतीय संघातील सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत ९ डावात केवळ १९० धावा करू शकला. याशिवाय तो ८ वेळा आऊटसाईड ऑफला खेळताना बाद झाला. तो एकाच प्रकारे प्रत्येकवेळी बाद झाल्याने त्याच्यावर जोरदार टीकाही झाली आहे.
आता त्याला त्याचा जिगरी मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने मोलाचा सल्ला दिला आहे.