
Australia vs India Test Cricket: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (५ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला कसोटी मालिका देखील ३-१ अशा फरकाने गमवावी लागली.
भारतीय संघाने १० वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीही गमावली. त्यामुळे भारतीय संघावर सध्या जोरदार टीका होत आहे. यातच आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी केलेल्या पोस्टने खळबळ उडाली आहे.