AB de Villiers emotional after South Africa wins WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा आज आफ्रिकेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजयानंतर भावनिक झाला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर द. आफ्रिकेने ५ विकेट्सने पराभूत केले. १९९८ नंतर आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा जिंकली. आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाचा मान पटकावण्यासाठी २७ वर्ष लागली आणि हा क्षण टीपण्यासाठी एबी डिव्हिलियर्सने मोबाईल खिशातून काढला. तो मोबाईलवर हा क्षण टिपत होता, पंरतु त्याचा कंठ दाटून आला होता. डोळे पाणावले होते... हा क्षण त्याच्यासाठी खूप खास होता.