AB de Villiers Smashes 28-Ball Century : ४१ वर्षीय एबी डिव्हिलियर्सने त्याच्या पहिल्याच स्पर्धात्मक सामन्यात वादळी शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजाने काही दिवसांपूर्वी निवृत्ती मागे घेतली आणि फक्त लिजंड्स लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले. टायटन्स लिजंड्स संघाकडून खेळताना एबीने बुल्स लिजंड्स संघाविरुद्ध २८ चेंडूंत शतक झळकावले आणि त्याच्या या खेळीत १५ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे एकही चौकार त्याने लगावला नाही.