AB de Villiers stunning catch Yusuf Pathan : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्स ( WCL) स्पर्धेतील सामन्यात ४१ वर्षीय एबी डिव्हिलियर्सचा जलवा पाहायला मिळाला. इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स लढतीत एबीने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले, परंतु वयाच्या ४१ व्या वर्षी सीमारेषेवर टीपलेल्या अफलातून झेलने साऱ्यांना स्तब्ध केले. आफ्रिकेने हा सामना डकवर्थ लुईस नियमाने ८८ धावांनी जिंकला.