Abhimanyu Easwaran and N Jagadeesan showed grit with crucial knocks for India A against Australia A.
esakal
Abhimanyu Easwaran and N Jagadeesan India A vs Australia A : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्यात भारतानेही दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला आणि त्याला भारताचे सलामीवीर अभिमन्यू इश्वरन व ए जगदीशन यांनी चांगले उत्तर दिले. पण, त्यांच्या खेळीने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे टेंशन वाढले आहे. इश्वरन भारताच्या कसोटी संघाचा ४ वर्षांपासून नियमित सदस्य आहे, परंतु त्याला एकदाही पदार्पणाची संधी मिळाली नाही. तरीही न खचता तो देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा करतोय आणि आजही त्याने तेच केले. त्यामुळे गंभीर आता तरी संधी देईल का? हा प्रश्न आहे. भारत पुढील महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.