ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

Abhishek Sharma T20I Century: अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ३५ चेंडूंत शतक झळकावत ११३ धावांची खेळी केली. चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय शतकासह त्याने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली असून आता रोहित शर्माच्या विक्रमावर त्याची नजर असेल.
ABHISHEK SHARMA

ABHISHEK SHARMA

esakal

Updated on: 

Abhishek Sharma T20I Century: भारतीय संघाने न्यूझीलंडच्या धर्तीवर यजमान संघाला तिसऱ्या टी-२० मध्ये ६ विकेट्सने लोळवत ही मालिका आपल्या खिशात घातली आहे. आज भारतीय संघ जणू कोणत्या जोशात मैदानावर उतरला होता, काय माहिती! भारतीय संघाने अशी फलंदाजी केली की किवी संघाला प्रश्नच पडला की भारताविरुद्ध सामना जिंकायचा तर किती धावांचं लक्ष्य द्यायचं? कारण भारतीय संघाने १९९ धावांचं लक्ष्य सहज गाठलं.

या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने आपल्या तुफानी खेळीने किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com