Abhishek Sharma created history against New Zealand by hitting the most sixes in a T20I series
esakal
Abhishek Sharma record in India vs New Zealand T20 series: अभिषेक शर्माने पुन्हा एका त्याच्या वादळी खेळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. तिसऱ्या ट्वेंटी-२०त अभिषेकने २० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी केली. त्याने १४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे भारतीयांमधील दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. त्याच्या आणि सूर्यकुमार यादवच्या ( २६ चेंडूंत नाबाद ५७ धावा) फटकेबाजीच्या जोरावर भारताने १० षटकांत विजय मिळवला.