

Abishek Porel Hits Century Against Delhi Days After Bail
Sakal
Ranji Trophy 2026, Delhi vs Bengal: भारतात सध्या रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धा सुरू झाली असून पहिल्या फेरीतील सामने खेळले जात आहेत. या फेरीतील कल्याणी येथे सुरू असलेला दिल्ली विरुद्ध पश्चिम बंगाल सामना युवा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलमुळे (Abhishek Porel) चर्चेत आला आहे.
या सामन्यात अभिषेक शतक झाल्यानंतर मैदानातच रडू लागला होता. खरंतर काही आठवड्यांपूर्वीच त्याला महिलेवरील आत्याचाराच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीत बंगालसाठी पुनरागमन केले आहे.