अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

SRH controversy over Pakistani player Abrar Ahmed पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला ‘द हंड्रेड’ स्पर्धेसाठी सनरायझर्स ली़ड्स या फ्रँचायझीने करारबद्ध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या फ्रँचायझीची मालकी सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) मालकांच्या समूहाकडे असल्याने भारतातही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Sunil Gavaskar reaction to Abrar Ahmed signing.jpg

Sunil Gavaskar reaction to Abrar Ahmed signing.jpg

esakal

Updated on

Kavya Maran Sunrisers Leeds Abrar Ahmed deal reaction : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वांची लाडकी काव्या मारन आता सर्वांच्या टीकेचा मारा सहन करतेय... सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकीण काव्या मारनने द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद याला २.३४ कोटींत करारबद्ध केले. सनरायझर्सची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाकडून पाकिस्तानी खेळाडू खेळणार आहे. काव्या मारनच्या या निर्णयानंतर संतापाची लाट उसळली आहे. परदेशातील विविध ट्वेंटी-२० लीगमध्ये आयपीएल फ्रँचायझींची गुंतवणूक आहे आणि त्यांनी यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंपासून दूरावा ठेवला आहे. पण, काव्याने ती परंपरा मोडली आणि आता महान खेळाडू सुनील गावस्कर यांनीही ( Sunil Gavaskar) त्यावर मोठं भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com