
Big Bash League 2025 : बिग बॅश लीग २०२४-२५ च्या ३१ व्या सामन्यात एका आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला. एडिलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात हा सामना खेळवला गेला. या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी विशेषतः फलंदाजीत दमदार खेळ करून दाखवला. पण, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना काही दुसरीच ठरली. या सामन्यात जेव्हा एका गोलंदाजाचा चेंडू फलंदाजाने सीमापार पाठवला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये त्या गोलंदाजांच्या वडिलांनी तो कॅच घेतला.