IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

Rashid Khan stunning catches and run out against India: अभिषेक शर्माच्या वादळी शतकामुळे भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, राशिद खानने आपल्या भन्नाट फिल्डिंगने सामन्याचा नूरच बदलून टाकला. गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही राशिदने आपली गुणवत्ता दाखवून दिली.
AFG vs IND 3rd T20I

Rashid Khan stunning catches and run out against India

esakal

Updated on

India vs Afghanistan 3rd T20I Marathi Live Update : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अभिषेक शर्माच्या ( Abhishek Sharma) वादळी शतकाने माहोल बनवले असले तरी अफगाणिस्तानच्या राशिद खाननेही ( Rashid Khan ) तो टॉपचा खेळाडू का आहे, हे दाखवून दिले. अभिषेकच्या विकेटनंतर संजू सॅमसन व शिवम दुबे यांचे अविश्वसनीय झेल अन् तिलक वर्माला भन्नाट थ्रो करून केलेले रन आऊट... याने राशिदने भारताच्या धावांवर लगाम लागली. २५० पार जाणाऱ्या भारतीय संघाला ७ बाद २२१ धावांवर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com