Shubman Gill & Gautam Gambhir
esakal
India vs T20I series against Afghanistan: अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी खूप मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumra Reddy) हे पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून ते संघ निवडीसाठी उपलब्ध आहेत. श्रीलंका दौऱ्याला मुकलेला वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीतून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. १३ सप्टेंबरपासून IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका सुरू होतेय आणि यात हार्दिक व नितीशची निवड होऊ शकते.