
Afghanistan vs South Africa: रायन रेकिल्टनचे शतक अन् टेम्बा बवुमासोबतच्या १२९ धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला फ्रंट सीटवर बसवले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील आजच्या लढतीत अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज आफ्रिकेला तालावर नाचवतील असे वाटले होते. पण, घडलं विरुद्धच... रायन व बवुमा यांनी आफ्रिकेचा पाया मजबूत केला आणि नंतर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व एडन मार्कराम या फलंदजांनी अर्धशतक झळकावत धावांचा डोंगर उभारला.