
Afghanistan vs South Africa: दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात मजबूत पकड घेतली आहे. अफगाणिस्तानच्या स्टार फिरकी गोलंदाजांना २८ वर्षीय रायन रिकेल्टन ( Ryan Rickelton ) कोळून प्यायला आणि शतक झळकावून शुभमन गिलला मागे टाकले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या पर्वातील हे पाचवे शतक ठरले.