
Younis Khan is Afghanistan's mentor and batting consultant : दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांच्या पहिल्या लढतीत विजय जवळपास पक्का केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाची ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमछाक झालेली दिसतेय आणि त्यांचा निम्मा संघ ८९ धावांत तंबूत परतला आहे. अफगाणिस्तानने या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मेंटॉर व फलंदाज सल्लागार म्हणून पाकिस्तानच्या माजी खेळाडूची नियुक्ती केली आहे. यापूर्वी २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा अफगाणिस्तानचा मेंटॉर होता. पण, त्याला डावलून अफगाणिस्तानने यंदा युनूस खानची निवड केली आणि त्यांची परिस्थिती पाहून नेटिझन्सनी खिल्ली उडवली.