
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत बुधवारी (२६ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात लाहोरला सामना होत आहे. या सामन्यात अफगाणिस्तान इंग्लंडसमोर तब्बल ३२६ धावांचं लक्ष्य ठेवण्यात यश मिळवलं आहे. यात सलामीवीर इब्राहिम झाद्रानचे मोठे योगदान राहिले. त्याने विश्वविक्रमी खेळी या सामन्यात केली.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी इब्राहिमने सलामीला फलंदाजीला येत ४९ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या बाजूने विकेट्स गेल्या, तरी एक बाजू भक्कम सांभाळली होती. त्याने त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतरही त्याची लय बिघडू दिली नाही आणि दीशतकही पूर्ण केले.