
South Africa beat Afghanistan : दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांच्या पहिल्या लढतीत विजय मिळवला. ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची दमछाक झाली. ब गटात दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान यांच्यासह इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे दोन तगडे संघ आहेत आणि त्यामुळे आजचा विजय हा आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या विजयाने अन्य संघांना गॅसवर ठेवले आहे आणि आता या गटातील चुरस अधिक रंजक होईल याची खात्री आहे. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने ९० धावांची खेळी करून कडवी टक्कर दिली.