
Champions Trophy 2025: पाकिस्तान आयोजक असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून या स्पर्धेसाठी सहभागी देश आता त्यांचे संघ घोषित करत आहेत. भारताव्यतिरिक्त इतर देश पाकिस्तानमध्ये सामने खेळणार आहेत, तर भारताचे सामने दुबईत रंगणार आहेत.
या स्पर्धेसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश यांचे संघही घोषित झाले असून आता अफगाणिस्ताननेही त्यांचा संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार आहेत.