अफगाणिस्तानने पाकिस्तानचा १८ धावांनी पराभव करून ट्वेंटी-२० तिरंगी मालिकेत दणदणीत विजय मिळवला.
अफगाणिस्तानकडून सेदीकुल्लाह अटल (६४) आणि इब्राहिम झाद्रान (६५) यांनी अर्धशतक ठोकत १६९ धावांचा डोंगर उभा केला.
पाकिस्तानकडून फहीम अश्रफने चार विकेट्स घेतल्या, पण इतर गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत.
Captain Salman Agha reaction after Pakistan’s defeat against Afghanistan : अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० तिरंगी मालिकेत पाकिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला १५१ धावा करता आल्या. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हॅरीस रौफ व सुफियान मुकीम यांनी १०व्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी करताना संघर्ष दाखवला.