Rohit Sharma - Yashasvi JaiswalSakal
Cricket
IND vs NZ 3rd Test: वानखेडेच्या कसोटीत २४ वर्षांनी जुळून आला योगायोग; मुंबईकर खेळाडूंमुळे झालं शक्य
Three Mumbai Local Players in Playing XI for IND vs NZ 3rd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा कसोटी सामना मुंबईत सुरू होताच मुंबईकर खेळाडूंबाबत एक खास योगायोग जुळून आला आहे.
India vs New Zealand 3rd Test: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
कारण यापूर्वीच भारताने या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.
दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बरं नसल्याने त्याच्या जागेवर मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.