Amit Mishra retires from cricket
esakal
आर. अश्विननंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा यानेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
मिश्रा भारताकडून शेवटचा ट्वेंटी-२० सामना २०१७ मध्ये खेळला होता आणि त्याची क्रिकेट कारकीर्द २५ वर्षांची राहिली आहे.
त्याने २२ कसोटी, ३६ वन डे आणि १० ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण १५६ विकेट्स घेतल्या आहेत.
Amit Mishra retires from cricket : आर अश्विनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली असताना आणखी एका फिरकीपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो भारताकडून शेवटचा ट्वेंटी-२० सामना २०१७ मध्ये खेळला होता आणि २५ वर्षांची त्याची क्रिकेट कारकीर्द राहिली आहे.