बीसीसीआयने बहुदिवसीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये Serious Injury Replacement नियम लागू केला आहे.
या नियमानुसार सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी like-for-like खेळाडू उतरवता येईल.
दुखापत फ्रॅक्चर, कट, विस्थापनासारखी गंभीर असावी आणि ती सामन्यातील खेळादरम्यान झालेली असावी.
BCCI serious injury replacement rule in domestic cricket: भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखली असली तरी या मालिकेत एक प्रश्न उपस्थित झाला होता. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. तो यष्टीरक्षक करू शकला नव्हता, परंतु इंजेक्शन घेऊन फलंदाजीला आला. त्याने तसे केले नसते तर भारताला १० फलंदाजांसहच खेळावे लागले असते. आयसीसीच्या नियमानुसार कन्कशन झालेल्या खेळाडूलाच बदली खेळाडू दिला जातो. रिषभच्या दुखापतीमुळे नियम बदलण्यावर बरीच चर्चा झाली आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) नेच पुढाकार घेत नियम बदलला आहे.